मोबाईलची जबरी चोरी करणा-यांना अटक

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणा-यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटनेत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता याबाबतचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी तिन पथकांची निर्मिती करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील तिघा पथकांनी एकुण पाच जणांना जेरबंद केले आहे.

पहिल्या पथकातील कर्मचा-यांनी रवंजा ता.एरंडोल येथील आरोपी विठ्ठल साहेबराव देशमुख यास ताब्यात घेत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या पथकाने सहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल हस्तगत केला. अटकेतील विठ्ठल साहेबराव देशमुख यास पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दुस-या पथकातील कर्मचा-यांनी मालेगाव येथील आरोपी इमरान उर्फ डोकोमो नाजिम अन्सारी आणि आरिफ इकबाल शहा अशा दोघांना ताब्यात घेत मेहुणबारे पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. अटकेतील दोघांकडून दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपासकामी अटकेतील दोघांना मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यातआले आहे.

तिस-या पथकातील कर्मचा-यांनी एजाज खान मजीद खान (रा. शेंदुर्णी ता. जामनेर) आणि फारुख रशिद शेख (रा. नागदुली ता.एरंडोल) अशा दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अठरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले असून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला गेला. अशाप्रकारे तिघा पथकांनी मिळून 34 हजार रुपये किमतीचे एकुण चार मोबाईल हस्तगत केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यापथकातील हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदिप सावळे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, विजय पाटील, किरण चौधरी, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटोल, लोकेश माळी, अशोक पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here