चोरीच्या चार मोटार सायकलींसह चोरटे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : मोटार सायकल चोरट्याकडून चोरीच्या चार मोटार सायकली चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत. पवन संजय साळुंखे (रा. सुंदरगढ़ी चोपडा) आणि अमोल राजेंद्र अहिरे (रा. खडगांव ता. चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याशिवाय एक अल्पवयीन बालकाचा देखील मोटार सायकल चोरीत सहभाग आहे.

चोपडा शहरातील लोहाना पेट्रोल पंप परिसरातून 12 जानेवारी रोजी संजय नाना देवरे यांच्या मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. अटकेतील दोघांकडून एकुण चार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने अटकेतील दोघांना 31 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

चोपडा पोलिस निरीक्षकांच्या पथकातील स.पो.नि. अजित सावळे, स.पो.नि. संतोष चव्हाण, पो. उप नि. घनशाम तांबे, सहायक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ  शेषराव तोरे, पोहेकॉ  विलेश सोनवणे, पोहेकॉ दिपक विसावे, पोहेकॉ  जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ शिवाजी धुमाळ, पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे, पोहेकॉ प्रदिप राजपुत, पोना संतोष पारधी, पोना हेमंत कोळी, पोना प्रमोद पाटील, पोना मधुकर पवार, पोना संदिप भोई, पोना. किरण गाडीलोहार, पोना ईश्वर धनगर, पोकॉ. मिलींद सपकाळे, पोकॉ. प्रकाश मधुरे, पोकॉ. रविद्र पाटील, पो.कॉ. प्रमोद पवार, पोकॉ. विजय बच्छाव,  सुमेर बधरे, शुभम पाटील,  आत्माराम अहिरे  आदींनी या कारवाईकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here