मुलभुत प्रश्नांसाठी जनता तळमळत असतांना नगरसेवक कुठे होते? –  दीपककुमार गुप्ता

जळगाव : जळगाव शहरातील करदाता असलेली मायबाप सामान्य जनता रस्ते, गटार, दिवाबत्ती या मुलभुत प्रश्नांवर तळमळत आहे. ही सामान्य जनता मुलभुत प्रश्नांसाठी तळमळत असतांना आयुक्तांवरअविश्वास प्रस्ताव मांडणारे नगरसेवक त्यावेळी कुठे होते असा एक प्रश्न सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी मांडला आहे. जळगाव महानगरपालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यास साधारण एक महिना बाकी आहे. त्यापुर्वी नगरसेवकांनी आयुक्तांवर अविश्वासाचा प्रस्ताव मांडला असल्याच्या पार्श्वभुमीवर दीपककुमार गुप्ता यांनी आपले म्हणणे लोकशहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडले आहे.

आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव मांडणा-या नगरसेवकांनी आपापल्या धर्मानुसार जसे भगवदगिता, कुराण, बायबल या ग्रंथांवर हात ठेवून शपथ घेवून कथन करावे की त्यांनी आपले मित्र, नातेवाईक, हस्तक आदींमार्फत स्वत: मनपाचे एकही टेंडर घेतलेले नाही. जर असे असल्यास आपले नगरसेवकांच्या मागणीला समर्थन असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे.   मुळातच नगरसेवकांना मनपाचे टेंडर घेण्याचा कायदेशीर अधिकार नाही. जर कुणी नगरसेवक मनपाचे टेंडर स्वतः घेत असल्यासत्या नगरसेवकाला मनपा अधिनियमानुसार त्याच्या नगरसेवकपदावरून अपात्र केले जाऊ शकते. असे असतांना देखील जर नगरसेवक म्हणत असतील की त्यांच्या कामाची बिले आयुक्त मंजूर करत नाही. त्यासाठीच आम्ही आयुक्तांविरुद्ध अविश्वास ठराव आणत आहोत. तर याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की पाच वर्ष नगरसेवकाचे पद भोगल्यानंतर सर्वजण एकत्र होत आहेत.

जळगाव शहरातील करदाते सामान्य नागरिक व सामान्य मतदारांच्या डोळ्यात ही धूळफेक आहे. पाच वर्ष आपल्या नगरसेवक पदाला न्याय देवू शकले नाही म्हणून नाकर्तेपणाला लपवण्यासाठी हा खटाटोप असल्याचा दीपककुमार गुप्ता यांचा आरोप आहे. जळगावकर सामान्य जनता, कर देणारी जनता रस्ते, गटारी, पाणी यासारख्या मुलभुत प्रश्नांवर तळमळत असतांना ही नगरसेवक मंडळी तेव्हा कुठे होती असा एक प्रश्न गुप्ता यांनी मांडला आहे. आजही जळगाव शहरातील नागरी वस्त्यांमधे रस्त्याच्या मुलभुत सोयी सुविधा नाही. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते तयार करण्याच्या नावाखाली खोदून ठेवले असून सर्वत्र चिखल साचला आहे. या सर्व गैरसोयी नगरसेवकांना दिसत नाहीत का? असा प्रश्न सामान्य जळगावकरांना देखील पडला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here