एमपीडीए कायद्याखाली तिन गुन्हेगार स्थानबद्ध

जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील तिन गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव येथील रामानंद नगर, भुसावळ बाजारपेठ आणि अमळनेर येथील तिघंविरुद्ध एमपीडीए कारवाईचा फास आवळला गेला आहे. विशाल भिका कोळी (कोळीवाडा पिंप्राळा जळगाव), हसनअली उर्फ आशु नियाजअली इराणी (रा. पापानगर झोपडपट्टी इराणी मोहल्ला भुसावळ) आणि विशाल दशरथ चौधरी (रा. भोईवाडा अमळनेर) अशी तिघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील रामानंद नगर हद्दीतील विशाल भिका कोळी याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली अकरा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पाच दखलपात्र गुन्हे असून दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील हसन अली उर्फ आशु नियाजाली इराणी याच्याविरुद्ध विविध कलमाखाली एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. अमळनेर येथील विशाल दशरथ चौधरी याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय एक दखलपात्र गुन्हा आणि पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. विशाल कोळी आणि हसन अली या दोघांची नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर अमळनेर येथील विशाल चौधरी याची पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here