जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्यास अटक

जळगाव : जबरी चोरी व घरफोडी करणा-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अरबाज आरिफ पटेल असे भुसावळ येथील जाम मोहल्ला परिसरात राहणा-या व सध्या अटकेतील आरोपीचे नाव आहे. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बळजबरी मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी अरबाज पटेल याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद होता. हा गुन्हा उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हेशाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या अख्त्यारीत हे.कॉ. विजयसिंग पाटील, सदिप सावळे, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, सचिन महाजन, ईश्वर पाटील, किरण चौधरी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here