एक हजाराची लाच – पुरवठा लिपीकाविरुद्ध गुन्हा

जळगाव : रेशन कार्ड मधून नावे कमी करुन नवीन रेशन कार्ड काढून देण्याकामी एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या पुरवठा लिपीकाविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. उमेश बळीराम दाते असे बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा लिपीकाचे नाव आहे. बोदवड पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या रेशनकार्डमधून स्वत:सह पत्नी व मुलांची नावे कमी करुन नवीन रेशन कार्ड तयार करायचे होते. या कामासाठी लाचेच्या स्वरुपात तक्रारदाराकडे लिपीकाने एक हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे त्यांनी एसीबी कार्यालयाकडे रितसर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलिस निरीक्षक सदाशिव वालझाडे करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here