घरगुती वादाला वैतागून दोघांचे पती बेपत्ता

जळगाव : घरगुती वादातून सासु  आणि पत्नीसोबत वाद घालून पती बेपत्ता झाल्याची घटना रावेर तालुक्यातील चिनावल येथे घडली आहे. याशिवाय दुस-या एका घटनेत जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील पतीने पत्नीला न सांगता घरातून निघून जाण्याचे काम केले आहे. घरगुती वादातून घडलेल्या दोन्ही घटनेत सौभाग्यवतींनी आपला पती बेपत्ता होण्याच्या तक्रारी संबंधित पोलिस स्टेशनला दाखल केल्या आहेत.

पहिल्या घटनेत रावेर तालुक्याच्या चिनावल येथील सौ. आरती नेमाडे यांनी आपले पती नरेंद्र अशोक नेमाडे बेपत्ता झाल्याची तक्रार सावदा पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. सासु आणि पत्नीसोबत वाद घालून नरेंद्र नेमाडे कुठेतरी निघून गेले आहेत. तसेच जळगाव तालुक्यातील सौ. स्वाती शामकांत चौधरी यांनी आपले पती शामकांत रघुनाथ चौधरी हे कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची तक्रार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला केली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here