जेष्ठ कवीवर्य, पद्मश्री ना.धो. महानोर यांना भावपुर्ण श्रद्धांजली – अशोकभाऊ जैन

जळगाव : महाराष्ट्राचे निसर्गकवी म्हणून ख्यातीप्राप्त असलेले प्रगतीशील शेतकरी तथा पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित  ना.धों.महानोर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज सकाळी 8.30 वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाप्रती जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती अशोकभाऊ जैन यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पद्मश्री ना.धो. महानोर यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख असल्याचे अशोकभाऊ जैन यांनी म्हटले आहे . पद्मश्री ना.धो. महानोर यांनी दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केले होते.   ते पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जात होते. तसेच हायटेक ऍग्री कल्चर शेतीचे ते पुरस्कर्ते होते. आमच्या परिवाराचे जेष्ठ सदस्य असलेल्या महानोर दादांना  आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली – अशोक जैन भवरलाल अँड कांताबाई जैन परिवार, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, गांधी रिसर्च फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट  व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमीटेडचे सहकारी

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here