डंपरच्या धडकेत बालिका ठार

जळगाव : आईसोबत शाळेतून घरी जाणा-या चार वर्षाच्या बालिकेचा डंपरने दिलेल्या धडकेने अंत झाला. उपचारापुर्वीच या बालिकेला मृत्युने गाठले. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघाताने घटनास्थळी आक्रोश बघण्यास मिळाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे.

प्रेरणा नेमाडे असे मयत बालिकेचे नाव आहे. प्रेरणा ही पब्लिक स्कुलमधे नर्सरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर तिला घेण्यासाठी तिची आई आली होती. स्कुटीने मायलेकी घराच्या दिशेने माऊली नगराकडे जात होत्या. दरम्यान हॉटेल तनयजवळ भरधाव वेगातील डंपरने स्कुटीला धडक दिली. या धडकेत प्रेरणा गंभीर जखमी झाली. अपघात होताच डंपर चालक पळून गेला. जखमी प्रेरणा उपचारापुर्वीच मृत्युमुखी पडली होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here