मोटार सायकल चोरांची झाली ओळख परेड

जळगाव : जळगाव उप विभागातील मोटार सायकल चोरांची आज एमआयडीसी पोलीस स्टेशनला ओळख परेड घेण्यात आली. एकुण 44 आरोपींची ओळख परेड घेतांना डीवायएसपी संदीप गावीत यांच्यासह विभागातील सर्व प्रभारी अधिका-यांची यावेळी उपस्थिती होती.

ओळख परेड दरम्यान आरोपींचे इंट्रोगेशन फॉर्म भरण्यात आले. आरोपी मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात सक्रीय आहेत अथवा नाही या माहितीसह त्यांचे पत्ते आणि मोबाईल क्रमांकाची माहिती देखील यावेळी घेण्यात आली. आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या ओळख परेड दरम्यान डीवायएसपी संदीप गावीत यांच्यासह पो.नि. जयपाल हिरे, पो.नि. जैसवाल, पो.नि. अनिल भवारी, पो.नि. रंगनाथ धारबळे, प्रशिक्षणार्थी डिवायएसपी आप्पासाहेब पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here