मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेण्याच्या वादातून मारहाण

जळगाव : मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेण्यापुर्वी शिक्षकाला मारहाण करणा-या शिक्षकाविरुद्ध नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसिम अक्रम शेख मुसा असे मारहाण करणा-या व गुन्हा दाखल करण्यातआलेल्या  शिक्षकाचे नाव आहे.

शेख साबिर अहमद खलिलोद्दीन हे नशिराबाद येथील के.टी. उर्दू हायस्कुल येथे उप शिक्षक आहेत. ते 11 ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेणार होते. मात्र त्यांनी मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेऊ नये यासाठी त्यांना बळजबरी अडवून शिवीगाळ करण्यासह स्टाफ रुम मधे मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तु उद्या शाळेत कसा येतो तुला बघतो असे बोलून जीवे ठार करण्याची आपल्याला वसीम अक्रम शेख याने धमकी दिल्याचा आरोप शेख साबीर अहमद या उप शिक्षकाने केली आहे. पुढील तपास हे.कॉ. अतुल महाजन करत आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here