अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण

जळगाव दि.16 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूल भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. अनुभूती निवासी स्कूलमध्ये शिकत असलेल्या १२ राज्यातील विद्यार्थ्यानी, भारताच्या विविध राज्याच्या संस्कृती व भाषांच्या छटांमध्ये नृत्य व गायनाचे देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले.

नागरीकाच्या हक्क व जबाबदारीबाबत प्रबोधन करणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे स्वरूप अनुभूती शाळेच्या मूलतत्वांना ( भारतीय संस्कृती व परस्परावलंबित्व ) धरून असल्याचे मत प्रमुख पाहुण्या डॉ. प्रीती अग्रवाल यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व देशाच्या भविष्यातील गरजा याबद्दल आपले मत मांडले. भविष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन व निरंतर शिक्षणाचे महत्व डाॕ, अग्रवाल यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासीस दास, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here