दगडाच्या घावात मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

जळगाव : पैसे मागितल्याच्या कारणातून दोघा भावात झालेल्या वादाची परिणीती हिंसक स्वरुपात झाल्याने उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडाच्या घावात जखमी झाल्याने मरण पावलेल्या भावाच्या मुलाने याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

मुखा मानकू शिंदे असे पुरनाड वस्ती तालुका मुक्ताईनगर येथील मयताचे नाव आहे. पिंपरी पंचम तालुका मुक्ताईनगर शिवारात भागवत धनु यांच्या शेतात 10 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. मुखा माणकू शिंदे आणि पंढरी माणकू शिंदे हे दोघे भाऊ आहेत. दोघा भावांमध्ये पैशाच्या विषयावरुन वाद झाला होता. या वादात पंढरी याने मुखा याच्या डोक्यात दगड घातला. उपचारादरम्यान मुखाचा मृत्यू झाला. मयत मुखा शिंदे यांचा मुलगा दगडू मुखा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरी शिंदे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here