जळगाव शहरातील आरएल फर्मवर ईडीचे पथक दाखल

जळगाव : आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील राजमल लखीचंद (आरएल) या सराफी पेढीवर ईडी अर्थात सक्त वसुली संचलनालयाचे अधिकारी दाखल झाले. ईडी पथक अधिका-यांच्या वाहनांचा ताफा अचानक दाखल झाल्याने परिसरात काहीवेळ खळबळ माजली. दरम्यान दागिने खरेदीसाठी येणा-या ग्राहकांना आतमधे येण्यास बंदी घालण्यात आली.

राजमल लखीचंद ज्वेलर्स या सराफी पेढीची ईडी अधिका-यांकडून दिवसभर चौकशी सुरु होती. या चौकशीचा तपशील अद्याप समोर आला नसला तरी मनिष जैन हे अधिकारी वर्गासोबत चर्चा करत असल्याची माहिती मिळाली. ईडी आणि आयटी विभागाकडून ही चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here