घरकुलाचे बांधकाम प्रकरणी अभियंत्याविरुद्ध कारवाईची मागणी

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील पेसोडा येथील एका घरकुल लाभार्थ्याने  गृहनिर्माण अभियंत्यासोबत आर्थिक देवाणघेवाण करून घरकुलाचे बांधकाम न करता जुन्याच  बांधकामांवर घरकुलाचे अनुदान काढले असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित अभियंत्यावर निलंबन कारवाईची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

श्रोतापन्न प्रल्हाद दाभाडे यांच्या सहीचे निवेदन संग्रामपूर गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटल्यानुसार पेसोडा येथील भास्कर गोपाल भिसे यांनी पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी 85 हजार रुपये काढले आहे. जुन्याच बांधकामावर पैसे मिळवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. घरकुल लाभार्थी आणि पीएमवाय चे गृहनिर्माण अभियंता या दोघांनी संगनमताने हा प्रकार केला असल्याचा आरोप निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास 22 ऑगस्ट पासून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here