पेटीएम कंपनीसह व्यावसायिकाची करोडो रुपयात फसवणूक – चाळीसगावला गुन्हा

जळगाव : विश्वासाने देण्यात आलेले लॉगिन डिटेल्स, कागदपत्र आणि मेल आयडीशी मिळताजुळता मेल आयडी तयार करुन करोडो रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन शेटे (रा. सॉफ्ट इन्फोसेस प्रा. लि. 4, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडीया एमआयडीसी चिखलठाणा औरंगाबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. चाळीसगाव येथील फ्रीलान्स सर्व्हिस प्रोव्हायडर भरतकुमार उत्तम राठोड हे या गुन्ह्यातील फसवणूक झालेले फिर्यादी आहेत.

सचिन शेटे याने फिर्यादी भरतकुमार राठोड यांना पेटीएम कंपनीचे उत्तर महाराष्ट्र विभागासाठी रिसेलर म्हणून व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले. भरतकुमार राठोड यांचे चाळीसगाव येथे मास्टर माईंड सर्व्हिसेस नावाने आस्थापना आहे. विश्वासाने दिलेल्या आस्थापनेच्या कागदपत्रांसह मेल आयडी आणि लॉगिन डिटेल्सचा सचिन शेटे याने गैरवापर केला.

लॉगिन डीटेल्स तांत्रिक बाबींची दुरुस्ती करण्याचा बहाणा करत फिर्यादी भरतकुमार राठोड यांच्याकडून घेतलेल्या मेल आयडी शी मिळताजुळता मेल आयडी तयार केला. या मेल आयडीच्या माध्यमातून पेटीएम कंपनीचे 1 कोटी 87 लाख 6 हजार 477 रुपये किमतीचे क्रेडीट्स फिर्यादी राठोड यांनी वापरल्याचे भासवण्यात आले. त्यात राठोड यांचे नाव वापरुन कंपनीसोबत कम्युनिकेशन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here