जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा

जळगाव दि. 19 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनच्या वतीने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.  जैन परिवारातील सदस्य अभंग अजित जैन यांच्याहस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी मनिष शहा, अनिल जोशी, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन उपस्थित होते. आजच्या दिनाचे औचित्यसाधून सर्व छायाचित्रकारांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्यात.

जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास छायाचित्रकार राजेंद्र माळी, ललित हिवाळे,  हिमांशू पटेल, तुषार हरिमकर, योगेश संधानशिवे, जगदिश चावला, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन परिवाराने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. आज भवरलालजी जैन यांचे नातू अभंग अजित जैन यांनी  कंपनीतील सर्व छायाचित्रकारासोबत एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here