डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

जळगाव : उपचारासाठी आलेल्या रुग्ण महिलेचा विनयभंग झाल्याच्या आरोपाखाली अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत संतप्त जमावावर नियंत्रणमिळवण्यासाठी जादा पोलिस कुमक मागवण्यात आली होती.

चोपडा तालुक्यातील एक महिला उपचारासाठी अमळनेर येथे बुधवारी 23 ऑगस्ट रोजी अमळनेर येथील नर्मदा फाऊंडेशन हॉस्पीटल येथे आली होती. दरम्यान डॉक्टरने आपला विनयभंग केला असा महिलेचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर संतप्त जमाव दवाखान्याच्या बाहेर जमला होता. डॉक्टरला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जमावाने केली. परिस्थिती हाताळण्यासाठी डीवायएसपी सुनिल नंदवाळकर आणी पोलिस निरीक्षक विजय शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत जादा कुमक मागवली. डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगासह अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी सुनिल नंदवाळकर करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here