तरुणीचा मित्रासोबत अश्लिल फोटो व्हायरल करणा-याविरुद्ध गुन्हा

जळगाव : महाविद्यालयीन तरुणीचा तिच्या मित्रासोबत काढलेला फोटो मिळवून  त्याच्यात छेडछाड करुन त्याला अश्लिल स्वरुप देत व्हायरल करणा-या अज्ञाताविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयीन तरुणी अभियांत्रीकीचे शिक्षण घेत आहे.

महाविद्यालयीन तरुणीने काही दिवसांपुर्वी तिच्या मित्रासोबत फोटो काढला होता. महाविद्यालयात काढलेला तो फोटो कुणीतरी अज्ञाताने कुठूनतरी मिळवला. तो फोटो त्याने मॉर्फ करुन एका नग्नावस्थेतील महिला व पुरुषाच्या फोटोला जोडून बनावट फोटो तयार केला. नव्याने तयार झालेला तो फोटो त्याने तरुणीच्या व्हाटस अ‍ॅप क्रमांकावर धमकीच्या मेसेजसह पाठवला. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. बी.डी. जगताप करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here