पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे शालेय स्केटिंग स्पर्धेत प्राविण्य

जळगाव : एकलव्य क्रिडा संकुलात नुकत्याच झालेल्या शालेय स्केटींग स्पर्धेत जळगाव पोलीस दल स्पोर्टस अकॅडमीच्या स्केटिंग खेळाडूंनी चमकदार कामगिरी दाखवली आहे.  या खेळाडूंची आगामी शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक जागृती काळे, अश्विनी निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या यशासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस  उपअधीक्षक (गृह) रामकृष्ण कुंभार तसेच संपूर्ण वेल्फेअर अधिकारी व कर्मचारी आदींनी यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सक्षम बाउस्कर ,श्रवण महाले ,प्रणव नेरकर, लावण्या पुराणिक, अनुज पवार, दीपेश पाटील, तेजस्विनी सोनवणे, मानसी चौधरी, साहिल तडवी,ललित जाधव,  दुर्वेश पाटील अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here