तोतया जीएसटी अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून सेटलमेंट करण्यासाठी तिस लाख रुपयांची मागणी करणा-या तोतया विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब ठाकरे असे गुन्हा दाखल झालेल्या तोतया इंस्पेक्टरचे नाव आहे. एमआयडीसी हद्दीतील व्यापा-यांनी दाखवलेल्या एकजुटीने तोतया जीएसटी अधिका-याचे पितळ उघडे पडले आहे. त्याने अनेक उद्योजकांना अशाच पद्धतीने गंडा घातल्याचे देखील या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे. अशोक गोविंदराज मुंदडा या उद्योजक महोदयांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

अशोक मुंदडा यांची एमआयडीसी परिसरात अशोक ट्रेडर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत प्लास्टिकचे दाणे तयार केले जातात. तोतया भाऊसाहेब याने अशोक मुंदडा यांना सुरुवातीला निरोप पाठवून त्यांच्या कंपनीच्या व्यवहारात घोटाळा असल्याचे सांगितले. या घोटाळ्यातून बचाव करण्यासाठी त्याने तिस लाख रुपयांची मागणी केली. मात्र उद्योजक अशोक मुंदडा यांनी सतर्क होत इतर व्यापा-यांची मदत घेत त्याला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here