तरुणाच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा – दोघा मारेक-यांना अटक

जळगाव : मुलीसोबत बोलण्याचा राग मनात ठेवून लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील दोघा मारेक-यांना अटक करण्यात आली आहे.  ज्ञानेश्वर उर्फ पिंटु बिजलाल बोदडे (रा. अष्टमी कॉलनी मुक्ताईनगर) आणि निलेश रोहिदास गुळवे (रा. प्रियका किराणा जवळ, रामेश्वर कॉलनी, मेहरुण जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

जळगाव एमआयडीसी परिसरातील विदर्भ रोडलाईन्स येथे सागर रमेश पालवे हा जामनेर तालुक्यातील रहिवासी तरुण चालक म्हणून कामाला होता. मुलीसोबत बोलण्याच्या वादातून आणि रागातून दोघांनी मिळून सागर पालवे याला लाठाकाठ्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत सागरचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी सागरच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील दोघा मारेक-यांना अटक करण्यात आली आहे.

अटकेतील दोघांना न्या. श्रीमती जान्हवी केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 12 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ नितीन पाटील, किरण पाटील, सुधीर साळवे, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी, पोलीस चालक संदीप बि-हाडे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास पोउनि निलेश गोसावी, पोकॉ संदीप धनगर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here