अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

जळगाव : जळगाव डाक विभागातील कर्मचारी व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे बॅडमिंटन खेळाडू अतुल प्रकाश ठाकूर यांची डाक विभागातर्फे नागपुर येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

त्यांना जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील संघ रायपूर (छत्तीसगड) येथे नोव्हेंबर 2023 मध्ये होणार्‍या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होईल. त्यांच्या यशाबद्दल डाक विभागाचे अधीक्षक एस. एस. म्हस्के, सहाय्यक अधीक्षक एम. एस. जगदाळे व सर्व कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here