कर्ज वसुलीच्या रकमेचा गैरवापर – बॅंक अधिका-या विरुद्ध गुन्हा

जळगाव : कर्ज वसुलीची रक्कम बॅंकेत जमा न करता ती रक्कम परस्पर खासगी कामासाठी वापरणा-या संबंधीत सिनियर ऑफीसर (सेंटर मॅनेजर) विरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रमेश तायडे असे गुन्हा दाखल झालेल्या सिनीयर ऑफीसरचे नाव आहे. न्यायालयीन आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर येथे फिनकेअर स्मॉल फायनांस बॅकेची हिवरखेडा रस्त्यावर शाखा आहे. या शाखेत योगेश रमेश तायडे हा तरुण सेंटर मॅनेजर पदावर असतांना त्याच्याकडे महिलांच्या समुहाने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीची 4 लाख 15 हजार 139 एवढी रक्कम जमा झाली होती. सदर रक्कम बॅंकेत जमा न करता योगेश तायडे याने खासगी कामासाठी वापरण्यास स्वत:कडे ठेवून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रिजनल मॅनेजर (अधिकृत प्रतिनिधी) पदावरील राहुल शरद तोमर यांच्या फिर्यादीनुसार जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक दादाराव मोहिते करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here