रेकॉर्डवरील गुन्हेगारविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

जळगाव : गणपती उत्सव शांतततेत पार पडावे तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी यासाठी जळगाव पोलिस दलाच्या पटलावरील गुन्हेगार आझाद बहादूर भाट याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

गुन्हेगार आझाद बहादूर भाट याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया देखील झाल्या आहेत. एका गुन्ह्यात त्याच्याकडून दोन वर्ष मुदतीचा पंचवीस हजार रूपयांचा जात मुचलका घेण्यात आला होता. तरीदेखील त्याच्या बेकायदा कारवायांना आला बसला नाही.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयापाल हिरे यांनी गुन्हेगार आझाद भाट याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावकामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनूस शेख, हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील आदींनी याकामी सहकार्य केले. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक दीपक जगदाळे, रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, पोलिस नाईक इमरान सैय्यद, सुधीर सावळे, विशाल कोळी, राहुल रगडे, महिला कर्मचारी हसीना तडावी आदींच्या पथकाने आझाद भाट याची रवानगी नाशिक कारागृहात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here