जळगाव : तरुणीचे अर्धनग्न फोटो तिच्या भावी पतीला पाठवून तिची बदनामी तसेच तिच्याकडून खंडणीच्या स्वरुपात सोळा हजाराची रक्कम उकळणा-या तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही ज्या मुलीसोबत लग्न करणार आहात तिचे चारित्र्य बरोबर नसून तिच्यासोबत लग्न करु नका असा बदनामीकारक संदेश या तरुणाने संबंधीत तरुणीच्या भावी पतीला पाठवला आहे.
या घटनेतील तरुण व तरुणी हे दोघे जळगाव शहरातील गिरणा पंपीग रोड परिसरात राहतात. दोघे एकमेकांना ओळखतात. त्यामुळे या ओळखीतून तरुणाने तरुणीचे अर्धनग्न फोटो त्याच्या मोबाईलमधे काढले होते. दरम्यान तरुणीचे लग्न ठरले. त्यानंतर तरुणाने त्या तरुणीच्या भावी पतीला दुस-या नावाचा वापर करुन फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघे एकमेकांचे व्हर्चुअल फ्रेंड झाल्यानंतर तरुणीचे फोटो काढणा-या तरुणाने तिच्या भावी पतीला ते फोटो पाठवून तिची बदनामी केली. तुम्ही ज्या मुलीसोबत लग्न करणार आहात तिचे चारित्र्य बरोबर नसून तिच्यासोबत लग्न करु नका असा संदेश पाठवत सोबत फोटो देखील पाठवले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. महेश शर्मा करत आहेत. संशयीत आरोपी तरुणास अटक करण्यात आली आहे.