आजचे राशी भविष्य (06/10/2023)
मेष : मानसिक स्थैर्य कायम ठेवा. खर्चात वाढ होवून आर्थिक चिंता सतावण्याची शक्यता.
वृषभ : आपल्या निर्णय क्षमतेचा पूरेपूर उपयोग करा. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील.
मिथुन : व्यवसायात प्रगती होईल. वृद्धी होईल. सामाजिक कार्यात व्यत्यय येवू शकतो.
कर्क : न्यायालयीन कामे मार्गी लागण्याची शक्यता. भाग्याची ब-यापैकी साथ लाभेल.
सिंह : मध्यम फलदायी दिवस राहील. एखादी शुभवार्ता कानी पडेल. आरोग्याची काळजी आवश्यक.
कन्या : मानसिक संतुलन कायम ठेवून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. बचतीच्या योजना आखा.
तुळ : महत्वाचे निर्णय घेण्यापुर्वी घरामध्ये चर्चा करा. संभ्रम असल्यास निर्णय पुढे ढकला.
वृश्चिक : एखादा वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. व्यापारात वृद्धीसाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
धनु : आहारावर नियंत्रण ठेवून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. घरगुती कामात वेळ द्यावा लागेल.
मकर : काही प्राप्त केले तर काही गमवावे देखील लागू शकते. व्यवसायात चांगल्या लाभाची शक्यता.
कुंभ : आपण फसणार नाही याची काटेकोर काळजी घ्या. सारासार विचार करुनच निर्णय घ्या.
मीन : सामाजीक मान सन्मान मिळाल्याने मनोबल वाढेल. कौटूंबिक वातावरण उत्साही असेल.