उद्धव ठाकरे सरकार प्रमाणे काळजी घेणारे सरकार आता नाही – प्रा. नितीन बानगुडे पाटील

बुलढाणा :  ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून सरसकट विनाअट विनाशर्त शेतकऱ्यांना दोन लाखाच्या कर्जमुक्तीचा  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. इतिहासातील ही पहिलीच  योजना आहे. संग्रामपूर येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमात शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे बोलत होते.

पुढे बोलतांना प्रा. बानगुडे म्हणाले की नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना उद्धव ठाकरे सरकारने पन्नास हजार रुपयांचे  प्रोत्साहन अनुदान त्यावेळी घोषित केले. मात्र दुर्दैवाने ठाकरे सरकार कोसळले. नंतर आलेल्या सरकारने ते प्रोत्साहनपर अनुदान अद्याप पर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले नाही. सद्यस्थितीत विदर्भात अशी वस्तुस्थिती आहे की सरासरी दहा ते बारा शेतकरी दररोज आत्महत्या करतात आणि सर्वेक्षण असं सांगते की एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत. अशावेळी सरकारने त्यांना दिलासा दिला पाहिजे. यावेळी बोलतांना प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी भाजप – शिंदे गटावर चौफेर टीका केली. यावेळी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख  नरेंद्र खेडेकर यांनी सुद्धा वर्तमान शासनाच्या योजनांचा भांडाफोड केला.

यावेळी  दत्तात्रय पाटील सह संपर्कप्रमुख, वसंतराव भोजने  शिवसेना जिल्हाप्रमुख , तुकाराम काळपांडे जिल्हाउपप्रमुख ,  भीमराव पाटील विधानसभा संघटक, युवा सेनेचे रवींद्र भोजने, अमोल मोदे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी रवींद्र झाडोकार ता प्रमुख, अमोल ठाकरे किसान सेना तालुकाप्रमुख, शुभम घाटे शहर प्रमुख विजय मारोडे ,उपताप्रमुख कैलास कडाळे उपताप्रमुख, जनार्दन कुरवाडे , प्रल्हाद  अस्वार , रामदास मोहे ,जगन्नाथ मिसाळ, पंकज मिसाळ,  धनंजय अ वचार,भैय्या घिवे, प्रशांत इंगळे, वैभव मानकर ,आदी उपस्थित होते  तसेच या कार्यक्रमाला शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन राहुल मेटांगे यांनी केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here