ज.जि.क्रिकेट असो. आयोजित किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी स्पर्धेला सुरुवात

जळगाव : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दुसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी स्पर्धेला आजपासून अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरुवात झाली आज सकाळी साडेआठ वाजता मैदानावर श्री अशोक दहाड चंद्रेश दहाड एसटी खैरनार अरविंद देशपांडे अविनाश लाठी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन श्री अशोक दहाड व चंद्रेश दहाड यांच्या हस्ते करण्यात आले तर आजचा पहिला सामना तांदळे अकॅडमी आणि स्वराज रेडियन्स ब्ल्यू या दोन संघादरम्यान खेळण्यात आला त्याची नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री एस टी करणार यांच्या हस्ते करण्यात आले.

तांदळे अकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला त्यांचा संघ १६ व्या षटकार सर्व ६६ धावा वर बाद झाला त्यात हर्षल पाटील याने १२ धावा तर भूषण वाडेकर यांनी १० धावांचे योगदान दिले तर स्वराज रेडिएन्स ब्लू संघातर्फे शेख साद याने ३ शतकात ४ धावात ४ बळी मिळविले व इतर गोलंदाजांनी प्रत्येकी १ बळी मिळविले.

६७ धावांचे सोपे लक्ष्य घेणाऱ्या स्वराज रेडियन्स ब्लू संघाने हे लक्ष केवळ एक गडी गमावून सातव्या षटकात पूर्ण केले त्यात विशाल शिरसाट ३० धावा तर कुणाल पवार याने २१ धावांचे योगदान देऊन आपल्या संघाला नऊ गडी राखून विजय मिळवून दिला. स्वराज्य रेडियन्स ब्ल्यू संघाचा ४ गडी पटकावणारा शेख साद याला टॅलेंट सर्च अकॅडमी प्रायोजित सामनावीराचे पारितोषिक टॅलेंट सर्च अकॅडमी चे पंकज महाजन यांच्या हस्ते देण्यात आले

दुसरा सामना गोल्डन इलेव्हन विरुद्ध नायक क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान खेळला गेला गोल्डन इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ गडी बाद १८४ धावा केले त्यात मोहम्मद नदीम ३३ मंगेश पाटील २९ यशवंत शिंदे २५रोहीत पारधी १७ आणि अतुल झोपे नाबाद २४ धावा केले गोलंदाजी लोकनाथ सातपाटे व दीपक चौधरी प्रत्येकी दोन गडी बाद केल्या. प्रतिउत्तरात नायक क्रिकेट क्लब संघ १९ षटकात सर्व गडी बाद ११७ धावा केले त्यात मोइज् खान १९ व दीपक यादव नाबाद १५ धावा केला गोलंदाजीत हेमंत बहेरे चार वीरेन पाटील-तीन मिलिंद शिंदे अतुल झोपे किरण कोळी प्रत्येकी एक गडी बाद केल्या आणि हा सामना गोल्डन इलेव्हन संघाने ५७ धावांनी जिंकला या सामन्यात तीन षटकात १९ धावा देऊन ४ गडी बाद करणारा गोलंदाज हेमंत बहेरे सामनावीर ठरला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here