जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक महाजन यास तायक्वांडो स्पर्धेत कांस्यपदक

जळगाव : तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व उत्तर प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी नोयडा इनडोअर स्टेडियम येथे २ री खुली राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत २२०० खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता या स्पर्धेत खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करून उपविजेतेपद पटकावले.

यामध्ये वरीष्ठ गटात जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याने ८७ किलो आतील वजन गटात कांस्यपदक पटकावले त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच शासनाचे क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रविण बोरसे सर याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन, तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे सर यांनी अभिनंदन केले

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here