नोकरीच्या बनावट नियुक्तीपत्रासह 43 लाख रुपयात फसवणूक

जळगाव : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असल्याची बतावणी करत सरळ सेवा भरती मोहिमेअंतर्गत उप अभियंता पदावर नोकरी लावून देण्यासाठी तब्बल 43 लाख रुपये घेत बनावट नियुक्तीपत्र देवून फसवणूक केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया रिषीकुमार पाटील-राजपूत या पिंप्री चिंचवड येथील महिलेविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय भास्कर पाटील रा. भडगाव रोड चाळीसगाव यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. बनावट आदेशाची प्रत देऊन नोकरी न लावता फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here