नियमीत वैद्यकीय तपासणीसाठी खडसे मुंबईला रवाना

जळगाव : भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या छातीत काल शनिवार पासून वेदना सुरु होत्या. त्यामुळे त्यांना जळगाव येथील डॉ. विवेक चौधरी यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. तरी देखील नियमीत वैद्यकीय तपासणीकामी त्यांना मुंबई येथे रवाना केले जात आहे.

जळगाव येथील गजानन हार्ट केअरचे संचालक डॉ. विवेक चौधरी यांच्या दवाखान्यात त्यांच्या प्राथमिक तपासण्या झाल्या. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. चौधरी यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलतांना म्हटले आहे. तरीदेखील रिस्क नको म्हणून त्यांना मुंबई येथील दवाखान्यात नेले जाणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here