बाल लैंगिक अत्याचार करणा-यास 15 वर्ष सश्रम कारावास

जळगाव : बाल लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस पंधरा वर्षासाठी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अविनाश सुरेश धनगर (वय 22) (रा. भावेर ता. शिरपूर जिल्हा धुळे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या अल्पवयीन मुलीचे आरोपी सुरेश धनगर याने अपहरण करुन तिला रोहिणी, मानपुर मध्यप्रदेशात नेले होते. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण केले. पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 412/2021 भा.दं.वि. कलम 363, 366 (अ), 376 (1) डा (A), (N) सह बा. लै.गु. सं. अधि. 2012 चे कलम 4,5 (L), 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासात तांत्रीक बाबींचे विश्लेषण करुन गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी या दोघांना ओकारेश्वर मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले होते. गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे यांनी आरोपीस अटक केल्यानंतर पुढील सखोल तपास केला. परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायालय अमळनेर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या गुन्हयाची सुनावणी अमळनेर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधिश पी.आर चौधरी यांच्या समक्ष झाली. गुन्हयाची सुनावणी पुर्ण होवून दिनांक 06/11/2023 रोजी आरोपी अविनाश सुरेश धनगर याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम 363 कलमान्वये 5 वर्ष तसेच बालकांचे लैगींक अपराधापासुन सरक्षण कायदा 2012 चे 4 व 12 मध्ये 10 वर्ष अशी एकुण 15 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुन्हयाचा प्राथमिक तपास पोहेकॉ प्रदीप राजपुत यांनी केला असुन पुढील तपास स.पो.नि. अजित सावळे यांनी केला. या खटल्याचे न्यायालयीन कामकाज सरकारतर्फे सरकारी वकील राजेद्र बी. चौधरी यांनी पाहीले. पैरवी अधिकारी म्हणुन पो.कॉ. नितिन कापडणे यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here