जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा

जळगाव दि. १० (प्रतिनिधी) – भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे एकल(Standalone) तसेच एकत्रित (Consolidated) निकाल ९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या कन्सोलिडेटेड महसुलात २५.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहित कन्सोलिडेटेड महसूल १,३६१.९ कोटी झाला, तोच गतवर्षी तिमाहीत १,०८२ कोटी होता. या तिमाहीत कंपनीचा कन्सोलिडेटेड निव्वळ नफा ८.३ कोटी आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत  तोच निव्वळ तोटा १९.५ कोटी रुपयांचा होता. 

कंपनीने या सहामाहित कन्सोलिडेटेड महसुलात २२.६ टक्क्यांनी वाढ करून ३,०६३.० कोटी इतकी नोंद केली आहे. या सहामाहीत कंपनीचा कन्सोलिडेटेड निव्वळ नफा ४४.९ कोटी आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत तोच निव्वळ तोटा ७.७ कोटी रुपयांचा होता. कंपनीच्या हातात चांगल्या ऑर्डर्स आहेत. असे कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धातही सकारात्मक आर्थिक प्रगती कायम राहणार – अनिल जैन – कंपनीच्या ३० सप्टेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाही व सहामाहीचे  सकारात्मक आर्थिक निकाल आपल्या समोर मांडताना आम्हाला आनंद होत आहे. कंपनीने आपली व्यावसायिक रणनिती बदललेली आहे त्याचे सकारात्मक परिणाम गेल्या काही तिमाहिपासून दिसून येत आहेत. प्रोजेक्ट व्यवसायाच्या तुलनेत कंपनीने किरकोळ व्यवसायात अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. आयएमडीच्या (INDIA MILLENNIUM DEPOSITS) २०२३ च्या अहवालानुसार मान्सून सरासरीच्या ९४ % झाला. तो संपूर्ण भारतात समाधानकार म्हणता येईल. 

आर्थिक वर्षच्या दुसऱ्या तिमाही पावसाळा असल्याने शेतीविषयक कामे कमी असतात आणि त्यामुळे दुसऱ्या तिमाही मध्ये कंपनी इतर तिमाहीपेक्षा  कमी महसुलाची नोंद करते. असे असून देखील कंपनीने स्टॅण्डलोन महसुलात गत वर्षाच्या तुलनेत ३३ टक्क्यांची वाढ नोंदविलेली आहे. गत वर्षापेक्षा या वर्षी व्याज, कर, घसारा आणि कर्ज पूर्वीचा नफा ४५ टक्के झालेला आहे. 

प्लास्टिक व्यवसायात जल जीवन मिशन अंतर्गत चांगली मागणी, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पाईप्स, टिश्युकल्चर आणि भारत आणि परदेशातील खाद्य व्यवसायात बाजारपेठेतील वाटा वाढलेला आहे. देशांतर्गत व्यवसायातील भक्कम वाढ आणि उपकंपन्यांमधील चांगली कामगिरी यामुळे कंपनीला (2QFY24) या तिमाही कन्सोलिडेटेड आधारावर महसूलात २५.९ % वाढ आणि व्याज, कर, घसारा आणि कर्ज पूर्वीच्या कमाई मध्ये ५६% वाढ झाली. कंपनी आपले खेळते  भांडवल चक्र (Working Capital Cycle) सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत. कंपनी आपल्या उत्पादनातील नावीन्य, शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्यावरणीय उपाय आणि किरकोळ व्यवसायावर आपले संपूर्ण भारतभर डीलर्स नेटवर्क विस्तारून लक्ष केंद्रित करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात सकारात्मक आर्थिक प्रगती कायम राहण्याची अपेक्षा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केली.

कंपनीच्या पहिल्या सहामाहीचे (Standalone) आर्थिक निकालाचे वैशिष्ट्ये – एकूण महसुलात ३३.२% ची वाढ.(प्लास्टिक विभागासाठी किरकोळ आणि संस्थात्मक बाजारातील मजबूत मागणी). हाय-टेक ऍग्री डिव्हिजनला किरकोळ विक्रेत्यांकडील अधिकच्या मागणीमुळे ६.६% ची वाढ. एकूणच प्लास्टिक विभागात सर्वत्र उल्लेखनीय ८९.३ % ची लक्षणीय वाढ. (उदा. पीई पाईप्स, पीव्हीसी पाईप्स आणि प्लास्टिक शीट). कंपनीकडे एकूण  ७९७.५ ₹ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. यात हाय-टेक ऍग्रीसाठी – ₹ ३४४.८ कोटी, प्लास्टिक विभाग व इनपुट उत्पादन यांच्यासाठी ₹ ४५२.७ कोटी चा समावेश आहे. 

कंपनीच्या पहिल्या सहामाहीचे (Consolidated) आर्थिक निकालाचे वैशिष्ट्ये – एकूण महसुलात २२.६% ची वाढ. हाय-टेक ऍग्री विभाग ६.५% ने वाढला. पीई, पीव्हीसी पाईप प्लास्टिक विभागामध्ये ६२.५% ची लक्षणीय वाढ. भाजीपाला निर्जलीकरण विभागात वाढ – भारतातील १०.६% तर विदेशातील व्यवसायात ९.६% वाढ. कंपनीकडे एकूण  १,९९०.३ ₹ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. यात हाय-टेक ऍग्रीसाठी – ₹ ३४४.८ कोटी, प्लास्टिक विभाग व इनपुट उत्पादन यांच्यासाठी   ₹ ४६६.० कोटी आणि कृषी विभाग – ₹ १,१७९.५ कोटी रुपयांच्या ऑर्डर्सचा समावेश आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here