रेल्वे मालधक्क्यावर हमाल बांधवांना मिठाई वितरण

जळगाव : जळगाव रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेच्या वतीने हमाल बांधवांना दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मिठाईचे वितरण करण्यात आले. हमाल बांधवांची दीपावली गोड करण्याचा प्रयत्न हमाल माथाडी संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर यांनी केला. सुमारे 550 हमाल बांधवा आणि 30 भगिनींना मिठाई  देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जळगाव महानगरपालिकेचे माजी उप-महापौर अश्विनभाऊ सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, बंटी गवळी, विनोद कोळी, सीताराम सेठ, मुकुंद चौधरी, केशव आप्पा,सचिन पुरोहित आदी उपस्थित होते. मिठाई वितरण प्रसंगी अश्विन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आबा बाविस्कर हे हमाल बांधवांसाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यामुळे हमाल बांधवांनी नेहमीच आबा बाविस्कर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ द्यावी असे ते म्हणाले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी  हुसेन साबरी, दीपक माने,लहू हटकर,संतोष हटकर,राजू भाट, विकी माने, इम्रान शेख, सुरेश बाविस्कर, किरण तडवी, छोटू बाविस्कर,प्रेम सुरवाडे, सिध्दार्थ वानखेडे,विशाल सुरवाडे,गौतम बिराडे, मंगेश काजवे, राज सुरवाडे,राहुल जाधव, सोनू सोनवणे,रवी जंजाळे, भुषण रांजण, सागर सोनवणे,सागर जाधव,पप्पू राठोड आदींनी परिश्रम घेतले

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here