आजचे राशी भविष्य  14/11/2023

आजचे राशी भविष्य  14/11/2023

मेष : काही मित्र तुमच्या सहनशक्तीची परीक्षा बघतील. मात्र संयम ढळू देवू नका.

वृषभ : ताणतणाव दुर करण्याचा प्रयत्न करा. निष्काळजीपणा करुन चालणार नाही.

मिथुन : नातेवाईक व मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. जुनी येणी प्राप्त होण्याची शक्यता.

कर्क : रागावर नियंत्रण राखण्यात कस लागेल. विद्यार्थ्यांना पालकांकडून मिळालेली मदत मोलाची ठरेल.

सिंह : मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल. एखाद्या स्पर्धेत भाग घ्याल.

कन्या : आर्थिक घडी विस्कटली जावू शकते. आज परिवारासाठी तुम्ही मुबलक वेळ देवू शकता.

तुळ : नोकरीत अनुकुल परिस्थिती राहील. गृहीणींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्चिक : वरिष्ठांच्या मदतीने गहन प्रश्न सुटतील. नोकरदारांना कामाचा ताण पडेल.

धनु : घरगुती कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा बेत आखाल. जुन्या ओळखीतून काही कामे होतील.

मकर : घरी पाहुणे येण्याची शक्यता. लांबच्या नातेवाईकांची भेट होईल.

कुंभ : मनावरील एखादे दडपण कमी होईल. कामाचा ताण कमी होईल.

मीन : कुणावर अती विश्वास ठेवू नका. गोड बोलून काम करुन घ्यावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here