फटाके फोडण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रामनंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित साळवे, विजय साळवे, गौरव साळवे, आकाश सोनवणे उर्फ बंड्या आणि महेंद्र उर्फ दादु सपकाळे (सर्व रा. हुडको पिंप्राळा बौद्ध वाडा जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

महेंद्र सपकाळे वगळता चौघे जण फटाके फोडत होते. त्यावेळी गणेश भगवान पगारे यांनी फटाके फोडणा-या चौघांना माझ्या घरासमोर फटाके फोडू नका, माझी लहान मुलगी झोपलेली आहे असे समजावून सांगितले. गणेश पगारे यांच्या बोलण्याचा चौघांना राग आला. त्यामुळे सुमित साळवे याने गणेश पगारे यांना तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत दमदाटी आणि शिवीगाळ सुरु केली. दरम्यान पाचही जणांनी त्यांच्या हातातील तिक्ष्ण हत्याराने गणेश पगारे यांच्या डोक्यावर हल्ला केला. त्यात पगारे यांच्या डाव्या हातासह डोक्यावर दुखापत झाली.

आपला बचाव करण्यासाठी गणेश पगारे यांनी आरडाओरड केली असता त्यांची आई त्यांना सोडवण्यास आली असता त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर दुखापत झाली. जखमी गणेश पगारे यांचे वडील वाद सोडवण्यास आले असता त्यांना देखील धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही वेळाने हल्लेखोर पळून गेले. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here