दारु पिण्यास पैसे न दिल्याने कटरने दुखापत

जळगाव : दारु पिण्यास पैसे न दिल्याने चिडून जावून मद्यपीने एकाला चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ तसेच जीवे ठार करण्याची धमकी देत कटरने हातावर मारुन दुखापत केली. या घटने प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा बस स्थानकाच्या बाजुला पाण्याच्या टाकीजवळ शिव ट्रेडींग या दुकानाजवळ लखन अशोक मराठे यास दिपक पाटील नावाच्या इसमाने दारु पिण्यास पैसे मागितले. लखन मराठे याने दिपक यास पैसे दिले नाही. लखन याने तो काम करत असलेल्या दुकाना समोरुन दिपक यास जाण्यास सांगितले. रागाच्या भरात दिपकने लखन यास कटरच्या सहाय्याने दुखापत केली. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास संदिप छगन भोई करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here