सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

जळगाव : मयत व्यक्तींच्या नावाने खोटे दस्तावेज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडून सुमारे 26 हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजरेहिंगोणा या ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला आहे.

सन 2022 – 23 या कालावधीत घडलेल्या या घटनेप्रकरणी प्रसाद सुर्यंवशी यांनी फिर्याद दाखल केली आहे. कल्पनाबाई जीजाबराव पाटील (सरपंच), नंदकिशोर चिंधु सांगोरे (उप सरपंच), करुणा  रामकृष्ण इंधाटे (गृहीणी), मालती भागवत पाटील (सदस्या), आशाबाई नाना भिल (सदस्या), साहेबराव छगन पाटील (सदस्य), संगिताबाई छगन पाटील (सदस्या), शांताराम पाटील (तत्कालीन ग्रामसेवक) सर्व रा. मजरेहिंगोणा ता. चोपडा अशा सर्वांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पो.नि. कावेरी कमलाकर करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here