व्हिडीओचा धाक दाखवून तरुणीचे दुसरे लग्न मोडणा-याविरुद्ध गुन्हा

cartoon image of sexual harrashment

जळगाव : तरुणीसोबत वेळोवेळी शरीरसंबंध निर्माण करुन त्या व्हिडीओचा धाक दाखवून तिचे दोनवेळा लग्न मोडणा-या तरुणाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील महत्वाची बाब म्हणजे तरुणीचे वय 19 तर संशयीत आरोपीचे वय 50 वर्ष आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीत एकाच गावात तरुणी आणि तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध निर्माण करणारा 50 वर्षाचा इसम असे दोघे राहतात. या इसमाने त्याच्या घरी आणि लॉजवर तिला नेवून वेळोवेळी तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण केले. या प्रसंगाचे त्याने त्याच्या मोबाईलमधे चित्रीकरण करुन घेतले. या चित्रीकरणाच्या बळावर त्याने तिला ब्लॅकमेल करत तिचे पहिले आणी दुसरे लग्न मोडले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रोहीदास माळी करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here