चारित्र्याच्या संशयातून झालेला खून उघडकीस

जळगाव : चारित्र्याच्या संशयातून झालेला खूनाचा गुन्हा निंभोरा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथक आणि प्रयत्नाने उघडकीस आला आहे. दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी तिन ते साडे तिन वाजेच्या सुमारास निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील निंबोल शिवारातील गायरानकडे जाणा-या कच्चा रस्त्यावर हा खून झाल्याचे उघडकीस आले होते. शेख अफजल शेख अस्लम असे खून झालेल्या रावेर तालुक्यातील एनपूर येथील तरुणाचे नाव होते. या खून प्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 214/23 भा.द.वि. 302 नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांनी केलेल्या घटनास्थळ पाहणी दरम्यान मिळालेले पुरावे तसेच गोपनीय माहितीनुसार मयत अफजल याचे गावातील बुधीबाई भिल या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे अधिक तपासाअंती तांत्रीक विश्लेषण करण्यात आले.

तांत्रीक विश्लेषणानुसार या गुन्ह्यात बुधीबाई भिल या महिलेचा पती अर्जुन नरसिंग भिल याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जुन भिल याचा शोध घेतला असता तो त्याची पत्नी बुधीबाई भिल हिच्यासोबत परगावी निघून गेल्याचे समजले. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मध्य प्रदेशात आदिवासी तांड्यावर वेश बदलून रवाना करण्यात आले. सलग चार दिवस एलसीबी पथकाने अर्जुन भिल याचा शोध घेतला. अखेर त्याचा शोध लागला आणि त्याला माफिपालीया पाडा पोस्ट धुलकुट ता. नेपानगर जिल्हा बुरहानपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने आपला गुन्हा कबुल केला.  

मयत अफजल शेख याचे आपली पत्नी बुधीबाई हिच्यासोबत चारित्र्याच्या संशयातून आपण त्याची हत्या केल्याचे कबुल केले. आपण त्याला समजावले होते. मात्र तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता असे अर्जुन भिल याने पोलिसांना कथन केले.  त्या रागातून अर्जुन भिल याने अफजल यास ऐनपुर गावातील गायरान रस्त्यावर त्याच्या शेताकडे बोलावले. अफजल हा मोटार सायकलने एकटाच आला. त्यावेळी अर्जुन याने त्याच्याजवळ असलेल्या टोकराच्या दांड्याने अफजल यास त्याच्या डोक्यावर मारुन त्याला जीवे ठार केल्याची कबुली दिली. वैद्यकीय तपासणीअंती अर्जुन भिल  यास निंभोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, हे.कॉ. कमलाकर बागुल, महेश महाजन, दिपक पाटील, नितीन बावीस्कर, संदिप सावळे, श्रीकृष्ण देशमुख, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी, राहुल बैसाणे, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, लोकेश माळी, भारत पाटील तसेच रावेर पोलिस स्टेशनचे डी. बी. इन्चार्ज हेड कॉंस्टेबल ईश्वर चव्हाण तसेच निंभोरा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. गणेश धुमाळ यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक काशीनाथ कोंळबे, पोलिस उप निरीक्षक रा.का.पाटील, हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी, रिजवान पिंजारी, सुरेश अढायगे, किरण जाधव, स्वप्नील पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here