जळगाव : चालक ट्रक मागे घेत असतांना झालेल्या अपघातात कंपनीच्या गेटवरील वॉचमन जबर जखमी झाला. या अपघातानंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. सुकदेव सापकर असे मृत्यु झालेल्या वॉचमनचे नाव आहे. एमआयडीसी परिसरातील एम सेक्टरमधील जीबी इंडस्ट्रीज येथे ही घटना घडली.
सुकदेव सापकर हे जीबी इंडस्ट्रीज येथे गेटवर ड्युटी करत होते. दरम्यान माल भरुन आलेली ट्र्क मागे घेत असतांना सुकदेव सापकर यांच्या पोटावर धडक बसून ते गंभीर जखमी झाले. जळगाव येथील ओम क्रिटीकल केअर हॉस्पीटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला संबंधीत ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. दत्तात्रय बडगुजर करत आहेत.