जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून पान मसाला जप्त, एकास अटक

जळगाव : आरोग्यास अपायकारा असलेला पान मसाला, खर्रा, सुगंधी तंबाखु, स्वादिष्ट सुगंधी सुपारी आदी ऐवज कब्जात बाळगणा-यास अटक करण्यात आली आहे. प्रविण हिरामन पाटील असे अटक करण्यात दुकानदाराचे नाव आहे.

जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक राहुल पान सेंटर नावाच्या दुकानातून प्रविण पाटील याच्या कब्जातून सुमारे 42 हजार 836 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अन्न व औषश प्रशासन विभागाचे अधिकारी शरद मधुकर पवार यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here