धावत्या वाहनाची काच पुसण्याच्या प्रयत्नात दरीत वाहन कोसळून चौघे ठार

जळगाव : धावत्या वाहनात चारचाकी वाहनावरील पाणी पुसण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटून वाहन दरीत कोसळल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात घडली. या घटनेत चौघे जण ठार झाले असून वाहनावरील चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमएच41 व्ही 4816 या तवेरा वाहनाने अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय 19), चि. कृष्णा वासुदेव शिर्के (5), सौ. पुष्पा पुरुषोत्तम पवार (41), चि. सिद्धेश पुरुषोत्तम पवार (12), सौ.रुपाली गणेश देशमुख (35), सौ. वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (42), प्रकाश गुलाबराव शिर्के (68), सौ. शिलाबाई प्रकाश शिर्के (62), कु. पुर्वा गणेश देशमुख (7) असे मालेगाव येथील सर्वजण अक्कलकोट ते मालेगाव परतीचा प्रवास करत होते. अभय पोपटराव जैन हा वाहनचालक वाहन चालवत होता.

26 नोव्हेंबर 2023 च्या रात्री साडे अकरा वाजता घडलेल्या या घटनेत प्रवास करणारे अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय 19), चि. कृष्णा वासुदेव शिर्के (5), सौ. पुष्पा पुरुषोत्तम पवार (41), चि. सिद्धेश पुरुषोत्तम पवार (12), सौ.रुपाली गणेश देशमुख (35), असे पाच जण जखमी झाले आहेत. सौ. वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (42) ), प्रकाश गुलाबराव शिर्के (68), सौ. शिलाबाई प्रकाश शिर्के (62), कु. पुर्वा गणेश देशमुख (7) असे चौघे ठार झाले आहेत. पोलिस उप निरीक्षक कुणाल चव्हाण पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here