22 लाखांचा तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त

जळगाव : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त करुन मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रेमचंद हरिराम पंजवाणी (रा. सिंधी कॉलनी चोपडा रोड अमळनेर) यास अटक करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर ते बुरहानपुर रस्त्यावरील कर्की सिमा तपासणी नाक्याजवळप्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करतांना प्रेमचंद पंजवाणि पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here