स.पो.नि. संदिप परदेशी मेहुणबारे पोलिस स्टेशनला रुजू

sandip pardeshi API

जळगाव : नियंत्रण कक्षात नेमणूकीला आणि दुध संघातील गैर प्रकाराच्या गुन्ह्याचा तपास सक्षमपणे सांभाळणारे सहायक पोलिस निरीक्षक संदिप परदेशी यांची मेहुणबारे पोलिस स्टेशनला बदली झाली असून त्यांनी तेथील धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.

मेहुणबारे पोलिस स्टेशनचे स.पो.नि. विष्णु आव्हाड यांची पोलिस अधिक्षक वाचक शाखेत बदली झाली आहे. मेहुणबारे पोलिस स्टेशनला बदली झालेले स.पो.नि. संदीप परदेशी यांची बदली झाल्याने दूध संघातील तपासकाम कमी अधिक प्रमाणात थंड बस्त्यात जाण्याची शक्यता या निमीत्ताने वर्तवली जात आहे. मात्र त्यांच्यासम आणि तुल्यबळ अधिकारी त्यांच्या जागी यावा असे जनतेत म्हटले जात आहे. एक डॅशिंग अधिकारी म्हणून संदिप परदेशी यांची झलक मेहुणबारे परिसरातील जनतेला लवकरच दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here