बहिणीच्या पतीला उलटे लटकवून लाथा बुक्क्यांनी मारहाण

जळगाव : बहिणीच्या पतीला उलटे लटकवून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु भिमसिंग बारेला असे आमोदा खुर्द ता. जळगाव येथील उलटे लटकवण्यात आलेल्या जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला त्याच्या दोघा शालकांसह सासरा अशा तिघांनी उलटे लटकवून मारहाण केली.

राजु भिमसिंग बारेला याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नव्हते. त्यामुळे आपल्या बहिणीला त्रास देणा-या राजु बारेला याच्या विरुद्ध त्याच्या दोघा शालकांसह सास-याच्या मनात चिड निर्माणझाली होती. राजु बारेला हा त्याच्या मित्रासोबत मध्य प्रदेशात गेला होता. तो तेथून यावल तालुक्यातील लंगडा आंबा या गावी परत येत होता. तो परत येत असल्याची माहिती तिघांना समजली. तिघांनी राजूला पकडून त्यांच्या राहत्या घरात उलटे लटकावत मारहाण व शिवीगाळ केली. या घटनेत राजू बारेला जखमी झाला. या घटनेप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विनोदकुमार गोसावी करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here