जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमात पाकीटमारी – भुसावळला पाच जणांविरुद्ध गुन्हा

Pickpocket stealing a mans wallet

जळगाव : मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार कार्यक्रम भुसावळ तालुक्यातील कु-हा पानाचे गावी सुरु असतांना पाच अनोळखी इसमांनी 81 हजार 500 रुपये चोरी केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कु-हे पानाचे ता. भुसावळ येथील शेतकरी राजु रुपचंद चोधरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

कु-हे पानाचे गावी बस स्थानकावर 4 डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांचा सत्कार कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात  राजु चौधरी यांच्या खिशातील 15 हजार 500 रुपये अनोळखी पाच जणांनी त्यांना मारहाण करुन बळजबरी हिसकावून घेतले. त्याचप्रमाणे इतरांच्या खिशातील 66 हजार रुपये देखील हिसकावून घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक पुजा अंधारे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here