विघ्नहर्ता माणूसकीचा दिवा तेवत राहो; काव्यरत्नावली चौकात सामाजिक संदेश

जळगाव : कोरोना सारख्या संकट काळातही माणूसकीचा दिवा तेवत राहावे यासाठी विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी साकडे घालत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी आरास काव्यरत्नावली चौकात जैन इरिगेशनतर्फे साकारण्यात आली आहे. जैन इरिगेशनतर्फे काव्यरत्नावली चौकात सण, उत्सवाचा काळात सामाजिक संदेश देणारे सुविचार, सुशोभिकरण केले जाते. गणेशत्सवादरम्यानसुध्दा चौक सजविण्यात आला आहे.

लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, कसबा गणपती, पेशवा गणपती या गणरायांच्या शाडू मातीच्या सुंदर आणि आकर्षक   मूर्ती तेथे विराजमान करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्यांना बाप्पांचे दर्शन व्हावे या श्रध्देसह विद्युत रोषणाई सुध्दा करण्यात आली आहे. यासाठी पर्यावरणपुरक साहित्य वापरण्यात आले आहे.  गजानना-गणनायका विनम्र वंदन तुजला करितो!, धन धान्य विपुल वृध्दीसह घडी पुन्हा स्थिर होवो!!, भोवतालच्या वेदनांचे ओरखडे मिटून जावो !, माणूसकीचा दिवा जगाच्या उंबरठ्यावर तेवत राहो!! हे प्रेणादायी विचार मनाला उभारी देणारे ठरत आहेत. काव्यरत्नावली चौकातील सजावट जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतुन कांताई कार्यालयातील सहकारी जगदिश चावला यांनी कलाकृतीची निर्मिती केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here