जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन – पुरुष निवड चाचणी स्पर्धा संपन्न

जळगाव : जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व कैलास क्रीडा मंडळ आयोजित 71 वी जिल्हा स्थरीय पुरुष व महिला अजिंक्य निवड चाचणी स्पर्धा (आमदार चषक)नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धा या विजय पंडितराव कोल्हे क्रीडा नगरी एसटी वर्कशॉपच्या बाजूला या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक भगत बालाजी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक नितीन बरडे ललित चौधरी उद्योगपती भागवत बंगाळे माजी नगरसेवक अमित काळे विरेन खडके भरत कोळी माजी नगराध्यक्ष बंदुदादा काळे रोहन बाहेती महेश चौधरी दीपक सूर्यवंशी डॉक्टर निलेश चांडक बंटी भारंबे गिरीश नाईक सुनील इसाई योगराज सपकाळे प्रकाश मंडोरा सागर सोनवणे आदींल उपस्थित होते.

या स्पर्धेत 34 पुरुष संघ व सात महिलांचे संघ सहभागी झाले होते सदर स्पर्धेसाठी ग्रामविकास मंत्री गिरिशभाऊ महाजन खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये पुरुषांमध्ये प्रथम क्रमांकाने महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळ जळगाव यांनी पटकावला तर उपविजेता संघ क्रीडा रसिक मंडळ जळगाव तृतीय क्रमांक महर्षी फाउंडेशन क्रीडा मंडळ जळगाव यांनी पटकावला तर महिला गटात प्रथम क्रमांक स्वामी स्पोर्ट्स क्लब रावेर तर द्वितीय क्रमांक एकलव्य संघ जळगाव तर तृतीय क्रमांक छत्रपती क्रीडा मंडळ एरंडोल यांनी पटकावला. या स्पर्धेमधून बारा खेळाडू यांची निवड करून हा संघ राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे येथे सहभागी होईल सदर स्पर्धेसाठी निवड समितीमध्ये सुनील अत्तरदे चैत्राम पवार एकनाथ चौधरी यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी पंचप्रमुख सोनी यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी परीक्षक सुनील राणे कमलेश पाटील प्रकाश झोपे धनंजय पाटील अरविंद धांडे खडके कैलास भोळे अंकुश सोनवणे तुषार चौधरी दगडू माळी दामोदर कोल्हे यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here